पुणे येथे यावर्षीच्‍या श्री गणेशाच्‍या मूर्तींचा पुनर्वापर करून त्‍यापासून साकारणार पुढच्‍या वर्षीचे गणराय !

मुळात वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. असे असतांना प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या मूर्ती विसर्जन न करता त्‍यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्‍य आहे आणि पुनर्वापरासाठी घेतलेल्‍या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्‍याची अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी असेच भाविकांना वाटते !

पुणे येथील लष्‍कर भागातील श्री गणेशोत्‍सव मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांवर खंडणीचा गुन्‍हा नोंद !

येथे एका खाद्यपदार्थ विक्रेत्‍याला धमकावून १ सहस्र रुपयांची श्री गणेशोत्‍सवाची वर्गणी मागणार्‍या २ कार्यकर्त्‍यांना अटक केली आहे. नीलेश कणसे आणि अविनाश पंडित अशी अटक करण्‍यात आलेल्‍यांची नावे आहेत.

कसार्‍याजवळ मालगाडीच्‍या इंजिनमध्‍ये बिघाड वाहतूक खोळंबली !

दुपारी १ वाजून १० मिनिटांच्‍या नंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. याचा परिणाम कसारा-सी.एस्.टी., भुवनेश्‍वर एक्‍सप्रेस, धुळे-दादर या ३ गाड्यांवर झाला. त्‍यामुळे गाडीतील प्रवासी ताटकळले होते.

कोल्‍हापूर महापालिकेला भाविकांनी दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्ती ओढ्यात टाकण्‍याचा प्रयत्न झाल्‍याने तणाव !

भाविकांनी श्रद्धेने दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्तींची पुढे कशा प्रकारे विल्‍हेवाट लावली जाते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्‍यामुळे भाविकांनी श्री गणेशमूर्ती दान न देता शास्‍त्रानुसार नदीत विसर्जितच कराव्‍यात. त्‍यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना तरी टळेल !

भाविकांच्‍या सुविधेसाठी शेतकरी संघाच्‍या इमारतीचे तात्‍पुरते अधिग्रहण !- राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

शेतकरी संघ आणि ‘मॅग्‍नेट’ संस्‍था यांच्‍यातील वादामुळे ही इमारती गेली कित्‍येक वर्षे विनावापर पडून आहे. उत्‍पन्‍न मिळत नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे. उलट ही वास्‍तू आता भाविकांच्‍या सेवेसाठी वापरली जाणार आहे.’’

भाषेचा सन्‍मान करणे यात विरोध करण्‍यासारखे काय होते ? – राज ठाकरे

मराठी पाट्यांविषयी जागृती माझ्‍या महाराष्‍ट्र सैनिकांमुळे आली. त्‍यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन आहे. तुम्‍ही सतर्क राहिलात, तसेच यापुढेही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन या वेळी राज ठाकरे यांनी केले.

अमरावती येथील ज्ञानमाता शाळेतील ख्रिस्‍ती शिक्षक कह्यात !

शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्‍या एका अल्‍पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करत असल्‍याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्‍टेंबर या दिवशी मुख्‍याधापक यांना या प्रकरणी तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्‍

मिरज येथे काही गणेशोत्‍सव मंडळांकडून पौराणिक देखाव्‍यांचे सादरीकरण !

अवाढव्‍य आणि चित्रविचित्र मूर्ती, विद्युत् रोषणाईचा झगमगाट, तसेच ध्‍वनीप्रदूषणाला बगल देत काही गणेशोत्‍सव मंडळांनी पौराणिक देखाव्‍यांचे सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली आहेत.

चावी हरवल्‍यामुळे सातारा येथील तहसील कार्यालयातील ३ विभागांचे कामकाज ३ घंटे बंद !

खटाव तालुक्‍यातील वडूज येथील तहसील कार्यालयातील एका खोलीची चावी हरवली होती. त्‍यामुळे ३ विभागांचे शासकीय कामकाज जवळपास ३ घंटे बंद राहिले. दुपारी १२.३० वाजेपर्यंत चावी न सापडल्‍यामुळे शेवटी कुलूप तोडून कामकाजास प्रारंभ करण्‍यात आला.

आद्यशंकराचार्य यांच्‍या महान कार्यावर कलात्‍मक अंगाने प्रकाश टाकायचे भाग्‍य मला लाभले ! – आशुतोष गोवारीकर, दिग्‍दर्शक

‘बॉलिवूड’मधील सर्वोत्तम दिग्‍दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आद्यशंकराचार्य यांच्‍या जीवनचरित्रावर बेतलेल्‍या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्‍या ‘टि्‌वटर अकाऊंट’वरून माहिती देत आशुतोष यांनी आगामी ‘शंकर’ या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे.