७२ वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी बर्लिन (जर्मनी) येथील कार्डिनलचा पुतळा हटवला !

(कार्डिनल म्हणजे चर्चमधील पादर्‍यांना मिळणारे पद)

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीमध्ये ७२ वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी फ्रांज हेंगबस्क या कार्डिनलचा पुतळा बर्लिन येथील एसेन  ‘कॅथेड्रल’मधून (प्रमुख पाद्य्राचे स्थान असणारे चर्च) हटवण्यात आला. हा पुतळा वर्ष २०११ मध्ये लावण्यात आला होता. या कार्डिनलचा मृत्यू वर्ष १९९१ मध्ये झाला होता. त्याने केलेल्या लैंगिक शोषणाची प्रकरणे आता समोर आली आहेत.

सौजन्य Catty Newz 

एसेन कॅथेड्रलकडून सांगण्यात आले की, फ्रांज याच्याकडून १९५० च्या दशकामध्ये एका १६ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे, तसेच अन्य एका महिलेनेही वर्ष १९६७ मध्ये तिचे फ्रांज याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्या वेळी फ्रांज हा बिशप (वरिष्ठ पाद्री) होता. या पदावर तो पुढील ३३ वर्षे होता. वर्ष २०११ मध्ये व्हॅटिकनने म्हटले होते, ‘फ्रांज यांच्यावर करण्यात आलेले आरोप योग्य वाटत नाहीत.’ आताचे बिशप जोसेफ यांनी सांगितले की, वर्ष २०११ मध्ये फ्रांज याच्या विरोधात आरोप करण्यात आला होता; मात्र त्याची नीट चौकशी करण्यात आली नाही.

संपादकीय भूमिका 

या घटनेवरून आता असे किती पाद्री जिवंत किंवा मृत आहेत, ज्यांच्यावर असे आरोप करण्यात आले आहेत, त्याचे अन्वेषण झाले पाहिजे, असेच लक्षात येते !