कर्नाटकमध्ये गोमांस घेऊन जाणार्‍या चारचाकी वाहनाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावली आग !

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गोतस्कर सापडतात, ते सर्व यंत्रणा असणार्‍या पोलिसांना का सापडत नाहीत ? कि ते पैसे घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात ?

सैन्यदलांच्या अग्नीवीर भरती योजनेत मोठे पालट होण्याची शक्यता !

भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.

न्यू जर्सी (अमेरिका) येथे भारताबाहेरील सर्वांत मोठ्या हिंदु मंदिराचे ८ ऑक्टोबरला होणार उद्घाटन !

भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे.

कोकणातील गणेशोत्‍सवासाठी ९१७ बस पाठवल्‍याने मराठवाड्यातील प्रवाशांचे हाल !

राज्‍य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातून एकूण ९१७ बस कोकणासाठी सोडल्‍या आहेत. त्‍यामुळे मराठवाड्यातील लांब पल्‍ल्‍याच्‍या आणि जिल्‍हाअंतर्गत बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्‍सवाच्‍या पहिल्‍या दिवशी अनेकांची गैरसोय झाली आहे. 

विकृत वक्‍तव्‍याने ब्राह्मण संघटना संतप्‍त !

ऐतिहासिक नगर शहरातील ब्राह्मण संघटनांनी एकत्रित येऊन समाज एकीकरणाची वज्रमूठच बांधली. विकृत वक्‍तव्‍याने ब्राह्मण संघटना संतप्‍त झाल्‍या आहेत. शहरात लवकरच ब्राह्मण समाजाच्‍या महाअधिवेशनाचे आयोजन करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला.

पंचगंगेवर होणार्‍या आरतीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठांची उपस्‍थिती !

२३ सप्‍टेंबरला भाविकांनी प्रशासनाचे बंधन झुगारून देऊन उत्‍स्‍फूर्तपणे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. यानंतर पंचगंगा नदीवर प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता होणार्‍या पंचगंगेच्‍या आरतीसाठी तेथील भाविक श्री. स्‍वप्‍नील मुळे यांनी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांना आरतीसाठी उपस्‍थित राहून सहभागी होण्‍याविषयी विनंती केली.

पुणे येथील नाना-नानी उद्यानसमोरील कृत्रिम हौदाची विदारक स्‍थिती !

अत्‍यंत गढूळ पाणी आणि प्रचंड कचरा असलेला श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठेवलेला कृत्रिम हौद !

भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्‍यवस्‍थेचे भीषण संकट! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

अनेकांना ‘हलाल’ हा शब्‍द मांसापुरता मर्यादित आहे, असे वाटते. प्रत्‍यक्षात मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्‍लामी संकल्‍पना ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ निर्माण करण्‍यासाठी धान्‍य, शाकाहारी पदार्थ, औषधे, रुग्‍णालये, इमारती, उपाहारगृहे, पर्यटन, संकेतस्‍थळे आदी प्रत्‍येक क्षेत्रांत लागू करण्‍यात आलेली आहे.

कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.

सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍या भक्‍ताची पोलिसांकडून अडवणूक !

पोलिसांनी अशा प्रकारे कायद्याची कार्यवाही कधी अन्‍य धर्मियांच्‍या सणांच्‍या प्रसंगी केली आहे का ? हिंदूबहुल देशात आणखी किती काळ हिंदूंनीच त्‍यांच्‍या धार्मिक अधिकारांची गळचेपी सहन करायची ?