सोलापूर – सोलापूर येथे एक गणेशभक्त २३ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता त्यांच्या वडिलांसह छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेले होते. त्या वेळी पोलीस आणि ‘होमगार्ड’ यांनी या दोघांनाही श्री गणेशमूर्ती विसर्जनापासून रोखले आणि तलावात विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे सांगितले. या प्रसंगी त्या भक्ताने ‘श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन करणे हा माझा धार्मिक अधिकार आहे’, असे सांगून बंदी आदेश दाखवण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी असा कोणताही आदेश दाखवण्यास टाळाटाळ केली. याचसमवेत पोलिसांनी त्या भक्तासमवेत अरेरावीची भाषा वापरून अपशब्दही वापरले. (कथित प्रदूषणाचे कारण करून राज्यात अनेक ठिकाणी पोलीस प्रशासन भाविकांच्या धार्मिक अधिकारांचे हनन करत आहेत ! पोलिसांनी अशा प्रकारे कायद्याची कार्यवाही कधी अन्य धर्मियांच्या सणांच्या प्रसंगी केली आहे का ? हिंदूबहुल देशात आणखी किती काळ हिंदूंनीच त्यांच्या धार्मिक अधिकारांची गळचेपी सहन करायची ? – संपादक)
यानंतर त्या भक्ताने ‘तुम्ही विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत आहात’, असे सांगून तेथून बाहेर पडला. तो भाविक घरी परतत असतांनाही पोलीस आरडाओरड करत होते, तसेच तो भाविक ज्या रिक्शातून जात होता ती रिक्शा अडवून त्याला घरी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. शेवटी एका वाहनातून अधिकारी आले आणि त्यांनी ‘आदेश पहायचा असल्यास पोलीस ठाण्यात या’, असे सांगितले.
संपादकीय भूमिकाधार्मिक उत्सवांच्या वेळी धार्मिक कृती करण्यास भक्तांची अडवणूक करणार्या अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |