धर्मप्रेमी युवकांकडून झाडाखाली ठेवलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् विसर्जन !

रिसालदार गल्ली येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोरील वडाच्या झाडाखाली हिंदु देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची नोंद घेऊन काही धर्मप्रेमी हिंदू युवकांनी एकत्रित येऊन या सर्व प्रतिमा संकलित केल्या.

आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातून जाणार्‍या हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक आणि धारदार शस्त्रांनी आक्रमण

१५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली.