‘विश्व तेली दिना’च्या निमित्ताने सोलापूर येथे व्याख्यान !
सोलापूर, २४ सप्टेंबर (वार्ता.) – अनेकांना ‘हलाल’ हा शब्द मांसापुरता मर्यादित आहे, असे वाटते. प्रत्यक्षात मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्लामी संकल्पना ‘हलाल अर्थव्यवस्था’ निर्माण करण्यासाठी धान्य, शाकाहारी पदार्थ, औषधे, रुग्णालये, इमारती, उपाहारगृहे, पर्यटन, संकेतस्थळे आदी प्रत्येक क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आहे. या अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या धनाचा वापर जिहादी आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही ‘हलाल अर्थव्यवस्था’ एक भीषण संकट बनलेली आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केले. ‘विश्व तेली दिना’च्या निमित्ताने सोलापूर येथे तेली समाजाच्या वतीने ‘भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्यवस्थेचे भीषण संकट !’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सोलापूर तेली समाज अध्यक्ष श्री. परशुराम माढेकर, उपाध्यक्ष श्री. बाबुलाल परदेशी, कोषाध्यक्ष श्री. संतोष परदेशी, सर्वश्री चंद्रकांत माढेकर, बालकिसन मोकर, आनंद परदेशी, राजेश परदेशी, गोपाल परदेशी, प्रतीक्षित परदेशी, शीतल परदेशी, अभिजित परदेशी, श्रीकृष्ण परदेशी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. मंगेश बारस्कर आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाहलाल अर्थव्यवस्थेचे भीषण संकट उलथवून लावण्यासाठी नागरिकांसह पोलीस प्रशासनाचेही प्रबोधन आवश्यक आहे ! |