नूंह (हरियाणा) येथे विहिंपच्या आजच्या ‘बृजमंडल जलाभिषेक यात्रे’ला हरियाणा सरकारने अनुमती नाकारली !

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

तैवानमध्ये नवीन हिंदु मंदिराचे उद्घाटन !

तैवानची राजधानी तायपेयी येथे गेल्या आठवड्यात हिंदु मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिरात भगवान श्रीराम आणि महादेव यांच्या प्रतिमा स्थापित करण्यात आल्या आहेत.

चंद्र, मंगळ आणि शुक्र या ग्रहांपर्यंत जाण्याची क्षमता; मात्र आत्मविश्‍वास वाढवणे आवश्यक ! – ‘इस्रो’चे प्रमुख श्रीधर सोमनाथ,

स्वतःला मोठे विज्ञानवादी म्हणवणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांना चपराक ! इस्रोप्रमुख सोमनाथ यांच्याकडून हे पुरो(अधो)गामी काही शिकतील याची शक्यता नाही; कारण त्यांना त्यांच्या बुद्धीप्रामाण्याचा अहंकार आहे !

देहलीतील ८ मेट्रो स्थानकांवर खलिस्तानवाद्यांनी लिहिल्या भारतविरोधी घोषणा !

खलिस्तानी संघटनेवर बंदी घालूनही ती अशा प्रकारे कारवाया करून देश-विदेशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. सुरक्षादलांनी अशा संघटनांची पाळेमुळे खणून काढून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याची आवश्यकता आहे ! असे का होत नाही ?, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !

ऑस्ट्रेलियात युद्धाभ्यास करतांना अमेरिकी सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ३ सैनिक ठार !

ऑस्ट्रेलियात युद्धाभ्यास करतांना अमेरिकी सैन्याचे ‘व्हीव्ही-२२ ऑस्प्रे’ नावाचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये ३ सैनिक मृत्यूमुखी, तर ५ जण घायाळ झाले, अशी माहिती ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात देण्यात आली आहे.

 बंगालमध्ये फटाक्यांच्या अनधिकृत कारखान्यातील स्फोटात ८ जणांचा मृत्यू

राज्यात फटाक्यांचे अनधिकृत कारखाने कार्यरत असतांना आणि त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, यातून त्यांना लाच देण्यात आली आहे, असे समजायचे का ? असे पोलीस आणि राज्यातील निष्क्रीय तृणमूल काँग्रेस सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मुसलमान शिक्षकाकडून मारहाण !

हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

मोपा येथील प्रस्तावित ‘सनबर्न’ महोत्सवाला ग्रामस्थांचा विरोध !

‘सनबर्न’ महोत्सवात अमली पदार्थांच्या अतीसेवनाने काही जणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झाले आहे. या महोत्सवामुळे युवावर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे.

‘वर्सोवा-विरार सी-लिंक’, ‘मेट्रो ११’ यांसाठी जपान साहाय्य करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

६ दिवसांच्या जपान दौर्‍यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे २६ ऑगस्ट या दिवशी मुंबईत आगमन झाले. या वेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.

नाशिक येथे बिबट्याच्या आक्रमणात महिलेकडून प्रतिकार !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून अशी कृती का करत नाही ?