डार्विन (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात युद्धाभ्यास करतांना अमेरिकी सैन्याचे ‘व्हीव्ही-२२ ऑस्प्रे’ नावाचे हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये ३ सैनिक मृत्यूमुखी, तर ५ जण घायाळ झाले, अशी माहिती ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात देण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजून ४३ वाजता डार्विन बेटाच्या किनार्यावर हा अपघात झाला. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा यंदाचा हा सर्वांत मोठा युद्धसराव होता. या सैनिकी सरावात फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया या देशांच्या सैनिकांचाही सहभाग होता. या सरावात १५० अमेरिकी सैनिक सहभागी झाले आहेत.
यापूर्वी २९ जुलै या दिवशी अमेरिकेसमवेत झालेल्या सैनिकी सरावाच्या वेळी ऑस्ट्रेलियाचे सैनिकी हेलिकॉप्टरही कोसळले होते. त्यात ४ सैनिक ठार झाले होते.
3 US Marines killed, 20 injured in aircraft crash in Australia during training exercise https://t.co/1od5f7b2n9
— KKTV 11 News (@KKTV11News) August 27, 2023