चंद्र, मंगळ आणि शुक्र या ग्रहांपर्यंत जाण्याची क्षमता; मात्र आत्मविश्‍वास वाढवणे आवश्यक ! – ‘इस्रो’चे प्रमुख श्रीधर सोमनाथ,

‘इस्रो’चे प्रमुख श्रीधर सोमनाथ यांचे केरळमधील मंदिरात पूजा केल्यानंतर केले विधान !

श्रीधर सोमनाथ

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (‘इस्रोे’चे) प्रमुख श्रीधर सोमनाथ यांनी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर थिरूवनंतपूरम् येथील पूर्णमिकवू भद्रकाली मंदिरात जाऊन पूजा केली. या वेळी पत्रकारांशी बोलतांना श्रीधर सोमनाथ म्हणाले की, भारताकडे चंद्र, मंगळ आणि शुक्र या ग्रहांपर्यंत यान पाठवण्याची क्षमता आहे; मात्र त्यासाठी आत्मविश्‍वास वाढवण्याची आवश्यकता आहे. जर आत्मविश्‍वास वाढला, तर आपण प्रत्येक ग्रहावर पोहचू शकतो.

श्रीधर सोमनाथ पुढे म्हणाले की, अंतराळ क्षेत्राच्या विकासासाठी अजून आर्थिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे. आमचा उद्देश देशाचा विकास व्हावा, असा आहे.

विज्ञान आणि अध्यात्म यांचे संशोधन करणे, हा माझ्या जीवनाचा भाग !

स्वतःला मोठे विज्ञानवादी म्हणवणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांना चपराक ! इस्रोप्रमुख सोमनाथ यांच्याकडून हे पुरो(अधो)गामी काही शिकतील याची शक्यता नाही; कारण त्यांना त्यांच्या बुद्धीप्रामाण्याचा अहंकार आहे !

श्रीधर सोमनाथ म्हणाले की, मी एक संशोधक आहे. चंद्राचे संशोधन करत आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांचे संशोधन करणे, हा माझ्या जीवनयात्रेचा एक भाग आहे. मी अनेक मंदिरांमध्ये जातो, तसेच अनेक धर्मग्रंथांचे वाचन करतो.