|
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नीलगंज येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ झाले. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात अनेक लोक काम करत होते.
यापूर्वी मे मासामध्ये राज्यात ७ दिवसांत ३ स्फोट झाले होते. त्यांपैकी बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात झाला होता, ज्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्याआधी दक्षिण २४ परगणा येथे झालेल्या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला होता. पूर्व मेदिनीपूरमध्येही १६ मे या दिवशी फटाक्यांच्या अनधिकृत कारखान्यात हा प्रकार घडला होता. यामध्ये १२ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला होता.
#BengalNews | 8 killed, 5 injured in massive blast in a firecracker factory in West Bengal’s Duttapukur@KamalikaSengupt shares more details | @Sriya_Kundu pic.twitter.com/vlrX39bzPW
— News18 (@CNNnews18) August 27, 2023
संपादकीय भूमिकाराज्यात फटाक्यांचे अनधिकृत कारखाने कार्यरत असतांना आणि त्यांची माहिती पोलिसांना देण्यात येऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, यातून त्यांना लाच देण्यात आली आहे, असे समजायचे का ? असे पोलीस आणि राज्यातील निष्क्रीय तृणमूल काँग्रेस सरकार हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! |