श्री गणेशचतुर्थीला ‘जिओ एअर फायबर’ चालू होणार !

‘५ जी’ नेटवर्क आणि अत्याधुनिक ‘वायरलेस’ सेवा देणारे जिओ आस्थापनाचे ‘एअर फायबर नेटवर्क’ श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी, म्हणजे १९ सप्टेंबरला चालू होणार आहे.

ठाणे आणि बदलापूर येथे चरस अन् गांजा यांची तस्‍करी करणारे अटकेत !

मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करून समाजाला व्‍यसनाधीन करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्‍याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि उपसरपंच यांच्‍यात ग्रामपंचायतीमधील भ्रष्‍टाचारावरून वाद !

जिल्‍ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि माजी उपसरपंच यांच्‍यात भर कार्यक्रमात ग्रामपंचायतीमध्‍ये झालेल्‍या भ्रष्‍टाचारावरून वादावादी झाली.

२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार !

‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे.

तळोजा (खारघर) येथे सीमाशुल्‍क विभागाच्‍या अधिकार्‍याची आत्‍महत्‍या !

खारघर येथील तळोजा कारागृहासमोरील तलावात उडी मारून सीमाशुल्‍क विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी मयांक सिंग यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

आजपासून भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कोरोना महामारीच्‍या काळापासून गेले ३ वर्षे साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पितळ्‍या उंबर्‍यातून आतून बंद करण्‍यात आले होते. हे दर्शन २९ ऑगस्‍टपासून भाविकांना चालू करण्‍यात येत आहे.

दादर येथे सिद्धिविनायकाच्‍या ऑनलाईन दर्शनाच्‍या नावाखाली पैसे उकळणारा अटकेत !

‘कोणत्‍याही ‘अ‍ॅप’च्‍या माध्‍यमातून नोंदणी करू नये. नोंदणी करतांना सिद्धिविनायक मंदिर संस्‍थानच्‍या अधिकृत संकेतस्‍थळाला भेट द्यावी’, असे आवाहन ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद

सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे, त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथून कोकणात जाण्यासाठी ३ विशेष रेल्वे गाड्या

मुंबईवरून जाणार्‍या रेल्वेसाठी आतापर्यंत १ लाख ४ सहस्र गणेशभक्तांची तिकिटांची निश्चिती (कन्फर्म) झाली आहे.  त्या माध्यमातून रेल्वेला ५ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत.

श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे पोलिसांवर गोतस्करांचे प्राणघातक आक्रमण !

उद्दाम धर्मांध ! गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांध गोतस्करांची आता पोलिसांवर आक्रमण करण्यापर्यंत मजल गेली आहे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे !