२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार !

४ मासांनी यान सूर्याच्या जवळ पोचणार !

नवी देहली – ‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोची सूर्याच्या संदर्भातील ही पहिलीच मोहीम आहे. ४ मासानंतर हे यान पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर असलेल्या ‘लँग्रेस पॉईंट’, म्हणजेच ‘एल्-१’ या विशेष ठिकाणी पोचेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये हे ठिकाण आहे. या ठिकाणापासून सूर्याचे तापमान, सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अवकाशातील हवामानाची गतिशीलता आदींचा अभ्यास केला जाणार आहे.