Farmers Land  Of Gadag : कायदेशीर लढाईनंतर गदग येथील शेतकर्‍यांना त्यांची भूमी परत मिळाली !

कर्नाटकात वक्फ बोर्डाचा मोठा पराभव !

शेतकर्‍यांना मिळाले भूमींचे मालकी हक्क

गदग (कर्नाटक) – कर्नाटकातील मालमत्तांवर मनमानीपणे दावा करणार्‍या वक्फ बोर्डाला मोठा झटका बसला आहे. प्रदीर्घ लढाईनंतर गदग जिल्ह्यातील शेतकर्‍यांना न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या भूमींचे मालकी हक्क परत मिळाले आहेत.

१. मार्च २०१९ मध्ये वक्फ बोर्डाने राज्यातील गदग जिल्ह्यातील ३१५ शेतकर्‍यांच्या भूमींवर दावा केला होता. वक्फ बोर्डाकडून शेतकर्‍यांना नोटीस पाठवण्यात आली होती की, ते ज्या भूमीवर रहातात आणि शेती करत आहेत, ती भूमी वक्फ बोर्डाची असून शेतक्यांनी त्यांवर अवैधपणे नियंत्रण मिळवले आहे.

२. नोटीस मिळताच ‘आमच्या पूर्वजांनी ज्या भूमीवर शेती केली, ती भूमी वक्फ बोर्डाच्या मालकीची कशी होईल’, अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली. या भूमींची कागदपत्रेही शेतकर्‍यांकडे आहेत. त्यानंतर शेतकरी ऑगस्ट २०२२ मध्ये न्यायालयात गेले. प्रदीर्घ सुनावणी होऊन अखेर ३१५ शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा हक्क परत मिळाला आहे.

३. न्यायालयाने पीडित शेतकर्‍यांचा मालकी अधिकार कायम ठेवला आहे; मात्र अद्याप २०१ शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.