ठाणे आणि बदलापूर येथे चरस अन् गांजा यांची तस्‍करी करणारे अटकेत !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, २८ ऑगस्‍ट (वार्ता.) – येथील कोपरी भागातील मंगला हायस्‍कूलजवळ अमली पदार्थ विक्री करण्‍यासाठी आलेले प्रशांत कुमार रामबाबू सिंग (वय २७ वर्षे) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (वय २३ वर्षे) यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून ३० लाख रुपये किमतीचा २ किलो ६० ग्रॅम चरस जप्‍त करून त्‍यांच्‍या विरुद्ध कोपरी पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद केला आहे. त्‍यांना न्‍यायालयाने २९ अ‍ॅागस्‍टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बदलापूर येथे गांजाची तस्‍करी करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यांच्‍याकडून ३२ लाख रुपयांचा ९० किलो गांजा हस्‍तगत करण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका : 

  • मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करून समाजाला व्‍यसनाधीन करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्‍याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
  • आतापर्यंत अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई न होण्‍याला ‘पोलीस प्रशासनच कारणीभूत आहे’, असे कुणाला वाटल्‍यास चूक ते काय ?