|
बेंगळुरू (कर्नाटक) – इतिहास दाखवतो की, एकेकाळी भारत गणित, विज्ञान, अंतराळ विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रीया यांच्या क्षेत्रात अग्रेसर होता. वैदिक काळापासून ते आक्रमणकर्ते येईपर्यंत अशी परिस्थिती होती. जर भारत विज्ञानाच्या संदर्भात मागे पडला, तर ते १ सहस्र वर्षे आक्रमणकर्त्यांच्या राजवटीमुळे होते. या कालावधीत येथील वातावरण असे होते की, तरुणांचे विचार त्या दिशेने विकसित होऊ शकले नाहीत. वर्ष १००० ते १९४७ हा काळ असा होता की, विज्ञानाची विचारसरणी विकसित होऊ शकली नाही. या काळात विज्ञानाची कल्पना नव्हती आणि विश्लेषणात्मक विचारांचा अभाव होता. यामुळेच या काळात भारतात नावीन्य, शोध किंवा संशोधन दिसून आले नाही, असे वक्तव्य भारताचे जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान आस्थापन ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले. ते ‘इन्फोसिस २०२४ विज्ञान पुरस्कार’ सोहळ्यात बोलत होते.
🚩”From the Vedic era to the arrival of invaders, #India was at the forefront of scientific advancement” – Narayana Murthy, #InfosysFounder
🚩”Over the past 1,000 years, invaders have destroyed India’s scientific progress”
👉 Despite receiving education at an IIT and elevating… pic.twitter.com/HvBEyIHhlk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 16, 2024
मूर्ती यांनी माजी इस्रायली नेते शिमोन पेरेस यांच्या भाषणाचा संदर्भ देत म्हटले की, पेरेस म्हणत की, इस्रायलमध्ये आम्ही आमचा सर्वांत मोठा वारसा ओळखला आहे आणि ते आमचे ‘मन’ आहे. आम्ही सर्जनशीलता, नवोन्मेष आणि नवीन शोधांच्या माध्यमांतून नापीक वाळवंटांना भरभराटीच्या क्षेत्रात रूपांतरित केले अन् विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नवीन उंची दिली. यामुळेच आम्ही जगाचे नेतृत्व करू शकत आहोत. अशा कल्पनाच कोणत्याही देशाच्या विकासासाठी क्रांतीकारी ठरतात.
मूर्ती पुढे म्हणाले की,
१. इसवी सन् ७०० ते १७२० पर्यंत उझबेकिस्तान ते अफगाणिस्तानपर्यंतच्या आक्रमणकर्त्यांनी भारतावर आक्रमण केले आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर इंग्रज आले. त्यांनी भारताला त्यांची वसाहत बनवले.
२. जे आक्रमणकर्ते आले, त्यांचा विज्ञान आणि गणित यांच्याशी काहीही संबंध नव्हता. तथापि त्यांच्या तुलनेत ब्रिटिशांनीही काही प्रमाणात भारतियांना महत्त्वाकांक्षी कामांसाठी प्रोत्साहित केले.
३. आपली प्रगती मंदावली; कारण आपल्या तरुण पिढीवर भूतकाळातील छाप होती. जिज्ञासू मनाचा अभाव होता. विश्लेषणात्मक विचार आणि नावीन्यपूर्ण कल्पना आता पूर्वीसारखी राहिलेली नाही.
४. स्वातंत्र्यानंतर भारतात विज्ञानाला पुन्हा आरंभ झाला आणि इतक्या अल्प कालावधीत विज्ञानाच्या माध्यमातून काय पालटले जाऊ शकते ?, हे आपण दाखवून दिले आहे. त्याचा आणखी विस्तार करण्याची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिका‘आयआयटी’त शिक्षण घेऊनही, तसेच स्वत:च्या कुशल बुद्धीमत्तेच्या जोरावर व्यवसायाच्या माध्यमातून जगात भारताचे नाव मोठे केलेले असूनही नारायण मूर्ती यांनी या वक्तव्यातून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्वच अधोरेखित केले आहे. त्यामुळे यावरून त्यांच्या विरुद्ध पुरो(अधो)गाम्यांच्या उपटसुंभ जमातीने टीका केली, तरी नवल वाटू नये ! |