आक्रमण करणार्यांमध्ये तडीपारीची शिक्षा भोगणार्या धर्मांधाचा समावेश
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) – कर्जत येथील एका पत्राशेडजवळ काही गोवंशियांच्या हत्येसाठी त्यांना डांबून ठेवलच्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील हवालदार शिवराम मस्के यांना मिळाली होती. त्या माहितीची निश्चिती करण्यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी मस्के त्याठिकाणी गेले. या वेळी नदीम कुरेशी, ओंकार सायकर, समद कुरेशी, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला अतीक कुरेशी यांनी त्यांच्याकडील चारचाकी मस्के आणि साक्षीदार यांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसेच शासकीय वाहनास धडक देऊन वाहनाची हानी केली. तक्रारदार आणि साक्षीदार करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी शिवराम मस्के यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
या वेळी पोलिसांना त्या ठिकाणी १२ लहान वासरे, ३ गायी, १ साहीवल जातीची गाय इत्यादी जनावरांना निर्दयपणे हत्येसाठी डांबून ठेवले होते. अतीक कुरेशी यास पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातून तडीपार केले असतांनाही तो जिल्ह्यात बेकायदेशीरपणे फिरत होता. पोलिसांना पाहून तो पळून गेला.
संपादकीय भूमिका
|