नवी मुंबई – खारघर येथील तळोजा कारागृहासमोरील तलावात उडी मारून सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयांक सिंग यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना २५ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता घडली असून या संदर्भात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिंग हे उरण येथे कार्यरत होते. सीमाशुल्क विभागाकडे प्रलंबित असणारी काही देयके संमत करण्यासाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी २४ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या घरावरधाड टाकली होती.