गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहतुकीस बंद


रत्नागिरी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. २७ ऑगस्टपासून या निर्णयाची कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.


मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या  गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा; म्हणजेच रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता व्हावी, यासाठी सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे, त्यामुळे जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद असेल. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या अवजड वाहनचालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा.

या महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत.