Terrorist Misused PM Kisan Samman Nidhi : अल् कायदाच्या आतंकवाद्यांनी ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’चे पैसे शस्त्र खेरदीसाठी वापरले !

अन्य मुसलमानांनाही पैसे मिळण्यासाठी योजनेचा अर्ज भरण्यास सांगितले !

नवी देहली – अलीकडेच अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या आतंकवाद्यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’चे पैसे जिहादसाठी वापरल्याची माहिती देहली पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांमध्ये २ लोक या योजनेचे लाभार्थी असून त्यांनी सरकारकडून शेतीसाठी मिळालेले पैसे शस्त्र खरेदी करण्यासाठी दिले होते. ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत अल्प भूमी असलेल्या शेतकर्‍यांना प्रति वर्ष ६ सहस्र रुपये दिले जातात. हे पैसे ३ हप्त्यांत दिले जातात. शेतकर्‍यांना खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी ही योजना चालू केली आहे.

झारखंड आणि राजस्थान येथून पकडलेल्या अल् कायदा स्थानिक गटांतील आतंकवाद्यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली. आतंकवाद्यांच्या सांगण्यावरून आणखी काही लोकांनी या योजनेचे अर्ज भरल्याची माहिती देहली पोलिसांना मिळाली आहे. ते सरकारकडून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य  करण्यासाठी करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. देहली पोलीस आता अर्ज भरणार्‍यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी ११ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मुसलमान घेतात, असेच चित्र दिसत असते आणि आता या योजनेतून मिळणार्‍या पैशांचा वापर जिहादी आतंकवादासाठी होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारला सतर्क होणे आवश्यक आहे !