आलमट्टी धरणातून त्‍वरित विसर्ग वाढवा ! – कृष्‍णा महापूर नियंत्रण समिती

सांगली, सातारा आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांतील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू आहे. सांगलीत कृष्‍णा नदीची पातळी १८ फुटांवर गेली आहे. कोल्‍हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीकडे जात आहे.

परीक्षा परिषदेच्‍या प्रभारी आयुक्‍त शैलजा दराडे निलंबित !

अशा भ्रष्‍ट अधिकार्‍यांना कायमस्‍वरूपीच निलंबित करायला हवे, तसेच उमेदवारांकडून घेतलेली रक्‍कमही त्‍यांच्‍याकडूनच वसूल करायला हवी.

बंद सरकारी शाळांच्या इमारतीमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरवणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

बंद पडलेल्या सरकारी प्राथमिक शाळांच्या इमारती या अंगणवाडी, तसेच इतर संस्था चालवत असलेले ‘फाऊंडेशन’ आणि पूर्व प्राथमिक वर्ग भरवण्यासाठी द्यायला सरकार सिद्ध आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्र्यांनी अन्वेषणाचा निर्णय घ्यावा ! – वीजमंत्री ढवळीकर, गोवा

वीज खात्यात वर्ष २०१६ मध्ये राबवलेला १४५ कोटी रुपये खर्चाचा ‘एरियल बंच केबलिंग’ हा प्रकल्प निरुपयोगी ठरलेला आहे. या प्रकल्पाचे अन्वेषण करण्यास मी सिद्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी निर्णय घ्यावा.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या बुद्धीची मर्यादा !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘संत सांगतात ते सर्व खोटे’, असे म्हणणे, हे एखाद्या बालवाडीतील मुलाने एखाद्या विषयात ‘डॉक्टरेट’ केलेल्याला ‘तू सांगतोस ते सर्व खोटे आहे’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतीय संस्‍कृती वैज्ञानिक असल्‍याने ती विश्‍वाचे आकर्षण बनत आहे ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘‘आपल्‍यातील दुर्गुण नष्‍ट केल्‍याविना आपण यशस्‍वी होऊ शकत नाही. आपल्‍या जीवनात प्रतिदिन येणारा ताण आपल्‍या दुर्गुणांचा परिणाम आहे. यासाठी स्‍वतःमधील दुर्गुण नष्‍ट करण्‍यासाठी आपल्‍याला सद़्‍गुणांचा विकास केला पाहिजे. यामुळे आपले जीवन यशस्‍वी होईल.’’

‘ऑनलाईन गेम’चा जुगार !

‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्‍बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्‍हा एक हरतो, तेव्‍हाच दुसरा जिंकतो. यामध्‍ये हरणारे प्रसंगी आयुष्‍यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्‍थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे.

अशांवर कठोर कारवाई कधी होणार ?

केरळ विधानसभेचे अध्‍यक्ष ए.एन्. शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश, ही केवळ एक दंतकथा आहे’, असे वक्‍तव्‍य केले होते. भाजप आणि विहिंप यांनी त्‍यांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

पुनर्वसन कागदावरच ?

भूस्‍खलन आणि डोंगर खचण्‍याच्‍या घटना आताही घडत आहेत. या निमित्ताने प्रशासनाने पूर्वीच्‍या बाधित झालेल्‍या कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे ना ? याचा आढावा घ्‍यावा. यासाठी कालबद्ध कृतीशील कार्यक्रम आखावा, अन्‍यथा नेहमीप्रमाणे घोषणा केवळ कागदावरच, असे म्‍हणावे लागू नये !

केवळ स्‍वयंपाकघर नव्‍हे, हे तर एक औषधालयच !

१९ जुलै २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण धने, ओवा, लवंग, जायफळ,दालचिनी यांचे औषधी उपयोग वाचले. आजच्‍या अंतिम भागात काळी मिरी, बडीशेप, आले, सुंठ आदींसह अन्‍य पदार्थांची माहिती येथे देत आहे.