पुणे – शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त, तसेच प्रभारी आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित केले आहे. फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर ५ मासांनी राज्यशासनाने ही कारवाई केली. या प्रकरणी दराडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेत राज्यशासनाने निलंबनाचा आदेश दिला आहे. शासनाच्या पूर्वअनुमतीविना शैलजा दराडे यांना मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच निलंबनाच्या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. अटकपूर्व जामीनासाठी दराडे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
सौजन्य एजूवार्ता
संपादकीय भूमिकाअशा भ्रष्ट अधिकार्यांना कायमस्वरूपीच निलंबित करायला हवे, तसेच उमेदवारांकडून घेतलेली रक्कमही त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी. |