शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला ! – युनेस्को

स्मार्टफोनमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पहाता पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांना त्यापासून दूर ठेवणे आवश्यक !

भारत आपल्या सन्मानासाठी नियंत्रणरेषाही ओलांडू शकतो ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवाया पहाता सैनिकांनी नियंत्रणरेषा ओलांडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच भारतियांना वाटते !

डेन्मार्कमध्ये इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळले !

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे २५ जुलै या दिवशी तिसर्‍यांदा इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळण्यात आले. या घटनेवर जगभरातील इस्लामी देशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

गोव्यातील १३८ सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १० किंवा त्याहून अल्प विद्यार्थी

सरकारी प्राथमिक शाळांच्या परिसरात खासगी शाळांना अनुमती, सरकारी प्राथमिक शाळांचा दर्जा, मातृभाषेऐवजी इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल आदी अनेक कारणांमुळे सरकारी प्राथमिक शाळांची झाली ही दु:स्थिती !

पुणे येथील खडकवासला धरणातून मुठा नदीत १ सहस्र क्युसेक पाण्याचा विसर्ग !

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे २५ जुलै या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुठा नदीत १ सहस्र क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

१ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १ ऑगस्ट या दिवशी हा दौरा होणार असून या दौर्‍यात ते आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येणार आहेत.

बनावट नोटांची छपाई करून ते चलनात आणणार्‍या ७ आरोपींना अटक !

बनावट नोटा सिद्ध करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीला बार्शी शहर पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून टोळीतील ७ जणांना बार्शी शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कोयना धरणात ६० टी.एम्.सी.हून अधिक पाणीसाठा !

पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाचा जोर कायम असून धरणात प्रतिसेकंद सरासरी ६० सहस्र ३३८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

पिंपळे सौदागर (पिंपरी) येथील रस्‍ता खचल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिकांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

खासगी प्रकल्‍पाच्‍या बांधकामासाठी नागरिकांच्‍या जीवितास धोका उत्‍पन्‍न करणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, अशी घटना घडली आहे. या प्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्‍यावसायिक घन:श्‍याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांच्‍यावर सांगवी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.