समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक करू नये !

‘अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा रहित करा’, अशी मागणी सीबीआयने उच्‍च न्‍यायालयाकडे केली होती. ‘याचिकेत सुधारणा करण्‍याची अनुमती द्यावी’, अशी मागणी समीर वानखेडे यांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी आता न्‍यायालयात केली आहे.

सातारा येथे गुरुपौर्णिमा विशेष स्‍मरणिकेचे पू. योगेशबुवा रामदासी यांच्‍या हस्‍ते प्रकाशन !

या वेळी सनातनच्‍या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्‍त पू. योगेशबुवा रामदासी म्‍हणाले की, राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्‍थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्‍ये स्‍वधर्म, स्‍वभाषा, स्‍वराष्‍ट्राभिमान रुजवण्‍याचे कार्य सनातन संस्‍था करत आहे.

सांगली येथील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे सिद्ध !

मिरज रस्‍त्‍यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्‍स ज्‍वेल्‍स या शोरूमवर टाकलेल्‍या दरोड्यात दरोडेखोरांनी १४ कोटी रुपयांचे सोने, हिरे आणि रोकड चोरली होती.

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी १ सहस्र १९८ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र !

एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र असणे गंभीर आहे ! अशांना सदस्‍यत्‍व कुणी दिले ? सदस्‍यत्‍व देणार्‍यांचीही चौकशी होेणे आवश्‍यक !

पुणे येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

उपाशीपोटी रुग्‍णांची तपासणी कशी करावी ?, बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्‍येक बिंदूचे कार्य, मणक्‍याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्‍यून करावा ? या विषयावर डॉ. जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

हिंदूंचा उद्रेक !

भारतभरातील हिंदुद्वेषी घटनांतून बोध घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी त्यांचे संघटन बळकट करावे !

५३ वर्षांची प्रतीक्षा !

अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एवढा विलंब होण्यास उत्तरदायी असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडूनच धरणासाठी झालेला अतिरिक्त खर्च वसूल करायला हवा, तसेच त्यासाठी उत्तरदायी असणार्‍या सर्व संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाईही झाली पाहिजे.

धार्मिक भावना दुखावतील, असे लिखाण करू नका !

पोलिसांकडून नाशिककरांना दक्षतेच्‍या सूचना आणि कारवाईची चेतावणी देण्‍यात आली आहे. नाशिक पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ ही व्‍यवस्‍थाही चालू केली आहे.

अशांना आजन्‍म कारागृहात टाकण्‍याची शिक्षा हवी !

अहिल्‍यानगर आणि कोल्‍हापूर या शहरांत क्रूरकर्मा औरंगजेब अन् टिपू सुलतान यांंच्‍या उदात्तीकरणाच्‍या घटनेनंतर आता लांजा शहरातही एका धर्मांध मुसलमानाने ‘इन्‍स्‍टाग्राम’वर टिपू सुलतानचे ‘स्‍टेटस’ ठेवून त्‍याचे उदात्तीकरण केले आहे.

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.