पुणे येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

वेदना न्‍यून करण्‍यासाठी उपयुक्‍त ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत !

शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना मध्‍यभागी डॉ. दीपक जोशी

पुणे – ‘पुढील काळात भीषण आपत्‍काळ येणार आहे’, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी, तसेच अनेक संतांनी आधीच सांगून ठेवले आहे. आपत्‍काळ कसा असू शकतो ? हे कोरोना महामारीच्‍या काळात बहुतेकांनी अनुभवले. पुढे यापेक्षाही भीषण आपत्‍काळ येऊ शकतो आणि तेव्‍हा आधुनिक वैद्य उपलब्‍ध होतीलच, असे नाही. त्‍या काळात रुग्‍णांच्‍या वेदना कमी करता येण्‍यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी, यासाठी पुणे येथे ३ दिवसांच्‍या शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.

संतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत प्रार्थना करून भावपूर्ण वातावरणात शिबिराला प्रारंभ झाला. सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिरात सनातनचे पुष्‍कळ साधक सहभागी झाले होते. मणक्‍याचे आजार, गुडघ्‍याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणाच्‍या ३६ साधक रुग्‍णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. उपचारानंतर रुग्‍णांनी बरे वाटल्‍याचे सांगितले.

उपाशीपोटी रुग्‍णांची तपासणी कशी करावी ?, बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्‍येक बिंदूचे कार्य, मणक्‍याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्‍यून करावा ? या विषयावर डॉ. जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. शिबिरात केवळ तात्त्विक भाग न घेता प्रतिदिन ३ घंटे प्रात्‍यक्षिक आणि सराव घेण्‍यात आला. शेवटच्‍या दिवशी सर्वार्ंनी मनोगत व्‍यक्‍त केले. मनोगत मांडतांना बिंदूदाबन उपचार पद्धत शिकल्‍याचा आनंद, तसेच कृतज्ञताभाव सर्वांच्‍याच चेहर्‍यावर दिसत होता.

संतांची वंदनीय उपस्‍थिती !

या शिबिरात सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक आणि पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली.