भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. त्‍यासाठी सर्वाधिक साहाय्‍य भारतानेच केले होते. दुर्दैवाने केवळ ८ वर्षांच्‍या आतच, म्‍हणजे वर्ष १९८० मध्‍ये बांगलादेशाला ‘इस्‍लामिक राष्‍ट्र’ असे घोषित करण्‍यात आले. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे. तेथे हिंदु समाजावर प्रतिदिन मूक अत्‍याचार होत आहेत. यासाठी राज्‍याकडून आतंकवाद्यांना फंड दिला जातो.

१. बांगलादेशी नागरिकांकडून बंगाल, आसाम आणि पूर्वेकडील सहस्रो गावांमध्‍ये अतिक्रमण

अधिवक्‍ता जॉयदीप मुखर्जी

बांगलादेशी मुसलमान सहजपणे सीमारेषा ओलांडून भारतात घुसखोरी करतात. त्‍यानंतर त्‍यांना भारताचे निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्डही सहजपणे मिळतात. अशा प्रकारे ते भारताचे नागरिक बनतात आणि त्‍यांना मतदानाचा हक्‍कही मिळतो. बांगलादेशींच्‍या घुसखोरीमुळे बंगाल, आसाम आणि पूर्वेकडील राज्‍ये यांच्‍या किमान ३१ सीमावर्ती जिल्‍ह्यांच्‍या लोकसंख्‍येत पालट झाला असून हिंदु अल्‍पसंख्‍यांक झाले आहेत. हिंदूंच्‍या दृष्‍टीने हे अतिशय धोकादायक आहे. आता ते १०० मतदारसंघांमध्‍ये राजकीय पक्षांनी मुसलमानाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करू लागले आहेत. प्रत्‍यक्षपणे हे भारतीय प्रदेशात लपूनछपून केलेले अतिक्रमणच आहे. त्‍यामुळे बांगलादेशातील आणि  भारताच्‍या सीमावर्ती भागातील हिंदूंचा समतोल टिकून रहाणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्‍या खालचा प्रदेश, म्‍हणजे दक्षिण आसाममध्‍ये बांगलादेशी मुसलमानांचे वर्चस्‍व आहे. ही गोष्‍ट भारताच्‍या सार्वभौमत्‍वात्‍या दृष्‍टीने अत्‍यंत धोकादायक आहे. बंगालमध्‍ये अनुमाने ८ सहस्र अशी खेडी आहेत, जेथे एकही हिंदू शिल्लक नाही. आसाममध्‍ये अनुमाने ४ सहस्र गावे आहेत, जेथे हिंदु समाजाची टक्‍केवारी शून्‍यावर आली आहे. एवढेच नव्‍हे, तर त्रिपुरा, मेघालय आणि मणीपूर या पूर्वेकडील राज्‍यांतील काही जिल्‍हे अन् गावे येथील हिंदूंचीही टक्‍केवारी शून्‍य झाली आहे. ही गोष्‍ट आपल्‍या देशाच्‍या भवितव्‍यासाठी अत्‍यंत धोकादायक आहे. त्‍यामुळे अशा गावांमध्‍ये आपला आवाज वाढवणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

२. बंगाल आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील आघात

काही दिवसांपूर्वी संपूर्ण भारतात हिंसाचाराच्‍या घटना घडल्‍या. त्‍यात बंगालमधील हिंसाचार अत्‍यंत लाजिरवाणा होता. तेथे धर्मांधांनी हिंदूंवर पूर्वनियोजित अत्‍याचार केले. त्‍या वेळी हिंदूंना कसलेही संरक्षण नव्‍हते. हिंदूंची दुकाने किंवा प्रतिष्‍ठाने यांना लक्ष्य करून ती नष्‍ट करण्‍यात आली. हे अकस्‍मात् झालेले नाही, तर ते पूर्वनियोजित आक्रमण होते. तरीही उर्वरित भारतातील हिंदू शांत बसले आहेत. जोपर्यंत भारत बांगलादेशावर दबाव निर्माण करत नाही, तोपर्यंत पूर्वेकडील भागात हिंदूंचे भवितव्‍य कसे असेल, हे सांगता येत नाही. ही समस्‍या आपण भारत सरकारच्‍या लक्षात आणून द्यायला हवी.

बांगलादेशामध्‍ये हिंदूंवर धर्मांधांकडून धर्मांतर करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला जातो. याविषयी मी संयुक्‍त राष्‍ट्रांना एक निषेधपत्र पाठवले होते. बांगलादेशामध्‍ये दुर्गापूजेच्‍या वेळी ३०० हून अधिक हिंदु मंदिरांची तोडफोड करण्‍यात आली होती. मी बांगलादेशात गेेलो होतो. तेथे एक धाकेश्‍वरी मंदिर आहे. त्‍या मंदिराच्‍या मालकीची ३०० हून अधिक बिघा (भूमी मोजण्‍याचे परिमाण) (अनुमाने ६० एकर) आहे. आता त्‍या मंदिराच्‍या आसपासची केवळ २-३ बिघा भूमी शेष राहिली आहे. याचा आम्‍ही निषेध केला होता. ही भूमी धर्मांधांनी बलपूर्वक कह्यात घेतली आहे. भारतियांच्‍या डोळ्‍यांमध्‍ये धूळफेक करण्‍यासाठी बांगलादेश सरकारने २ बिघा भूमी मंदिराला अर्पण केली आणि म्‍हटले, ‘‘आम्‍ही तर भूमी परत केली आहे.’’ असे अनेक आघात बांगलादेशात चालूच आहेत. अशीच स्‍थिती भारताच्‍या पूर्वेकडील विविध राज्‍यांमध्‍येही आहे.

बांगलादेशामध्‍ये रमना काली नावाची कालीदेवी आहे. तिचे ढाका शहरामध्‍ये मंदिर आहे. शेख मुजिबूर रेहमान हे धर्मपेक्षतावादी होते, असे म्‍हटले जाते. ते बांगलादेशाचे संस्‍थापक आणि राष्‍ट्रपिता होते. भारताचे साहाय्‍य घेऊनही ते कट्टर निधर्मी होते, असे मला दुर्दैवाने म्‍हणावे लागते. त्‍यांच्‍या कारकीर्दीतच सर्वाधिक हिंदु मंदिरांचा विध्‍वंस करण्‍यात आला. रमना मंदिराची तोडफोड मुजिबूर रेहमानच्‍या काळातच करण्‍यात आली होती. अलीकडेच मंदिराचे नूतनीकरण करण्‍यात आले आहे.

हिंदूबहुल भारताला हिंदु राष्‍ट्र करण्‍यासाठी राज्‍यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्‍द काढणे आवश्‍यक !

‘हिंदु राष्‍ट्राविषयी आजच आवाज उठवला जात नाही, तर तो आजपासून २००  वर्षांपूर्वी याच भूमीत उठवला गेला होता. वर्ष १९४७ मध्‍ये भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर भारताची फाळणी झाली. तेव्‍हा पाकिस्‍तानने त्‍यांच्‍या देशाला ‘इस्‍लामिक देश’ असे घोषित केले. याउलट तेव्‍हाचे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारत ‘धर्मनिरपेक्ष’ राष्‍ट्र असल्‍याची भूलथाप मारली. भारतीय राज्‍यघटनेच्‍या मूळ प्रस्‍तावनेमध्‍ये हा शब्‍द मुळीच नव्‍हता. ‘वर्ष १९७२ मध्‍ये घटनादुरुस्‍ती करून त्‍यात हा शब्‍द घालण्‍यात आला. त्‍यामुळे सर्वप्रथम हा ‘धर्मनिरपेक्ष’ शब्‍द आपल्‍या राज्‍यघटनेतून काढला पाहिजे’, असा माझा प्रस्‍ताव आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. हा शब्‍द काढल्‍यानंतरच हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचे ५० टक्‍के काम पूर्ण होईल. तसेच आपले हिंदु राष्‍ट्राचे स्‍वप्‍नही यशस्‍वी होईल. राज्‍यघटनेत दुरुस्‍ती करण्‍यासाठी संसदेमध्‍ये दोन तृतीयांशहून अधिक बहुमत अत्‍यावश्‍यक आहे.

३. गोतस्‍करांकडून लाच स्‍वीकारणारे सीमा सुरक्षा दलाचे भ्रष्‍ट सैनिक गोमातेचे शत्रू !

भारताचे अखंडत्‍व राखण्‍यासाठी हिंदु समाज आणि हिंदुत्‍व यांचे रक्षण करणे आवश्‍यक आहे. काही वेळा सीमा सुरक्षा दलाच्‍या कारवायामुळे मी त्‍यांच्‍यावरही अप्रसन्‍न होतो. आसाम आणि बंगाल यांच्‍या सीमारेषेवरून सर्वाधिक प्रमाणात गोतस्‍करी होते. केंद्रात भाजपचे सरकार आल्‍यानंतर सीमारेषेवरील गोतस्‍करी ५० टक्‍क्‍यांनी न्‍यून झाली आहे. असे असतांनाही बंगाल आणि भारत-बांगलादेश यांच्‍या सीमारेषेवर चालणारी गोतस्‍करी ही समांतर अर्थव्‍यवस्‍था बनली आहे. सर्व गोतस्‍कर प्रत्‍यक्षात मुसलमान समाजाचे आहेत. ते सीमा भागातील श्रीमंत व्‍यक्‍तींमध्‍ये गणले जातात. मला दु:खाने म्‍हणावेसे वाटते की, सीमा सुरक्षा दलाचे सैनिक या गोतस्‍करांकडून पैशांची लाच घेतात. त्‍यांच्‍या साहाय्‍याविना एकाही गायीची तस्‍करी केली जाऊ शकत नाही. गोतस्‍करी ही बांगलादेशाची समांतर अर्थव्‍यवस्‍था आहे. या गोतस्‍करीचा पैसा जिहादी आतंकवाद्यांकडे वळवला जातो. या परिस्‍थितीविषयी विचार करणे आवश्‍यक आहे.

४. भारतात हिंदु बनून रहाण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक !

बंगालमध्‍ये मुर्शिदाबाद जिल्‍हा आहे. तेथील ७५ टक्‍के लोक मुसलमान बनले आहेत. १०० वर्षांपूर्वी हा भाग हिंदुबहुल होता. या भागामध्‍ये बांगलादेशी घुसखोरांनी घुसखोरी केली. त्‍यामुळे जिल्‍ह्याची संपूर्ण लोकसंख्‍या मुसलमानबहुल झाली. एका १६ वर्षांच्‍या हिंदु मुलीने फेसबुकवर ‘नुपूर शर्माचा निषेध करणार्‍यांनी पाकिस्‍तानमध्‍ये चालते व्‍हावे’, अशी प्रतिक्रिया दिली. त्‍यामुळे ५ सहस्र मुसलमानांनी तिच्‍या घरावर आक्रमण केले आणि तिचे संपूर्ण घर जाळून टाकले. या मुलीला न्‍यायालयीन कोठडी मिळाली. ही परिस्‍थिती आपल्‍या राष्‍ट्रासाठी भयंकर आहे. पुढील ५० वर्षांच्‍या आत हिंदूंना अल्‍पसंख्‍यांक करणे आणि मुसलमानांची लोकसंख्‍या वाढवणे, हेच त्‍यांचे धोरण आहे. त्‍यांची लोकसंख्‍या ७० टक्‍के होईल, तेव्‍हा ते भारताच्‍या दुसर्‍या फाळणीची मागणी करतील.’

– अधिवक्‍ता जॉयदीप मुखर्जी, ‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ (अखिल भारतीय कायदेशीर साहाय्‍य मंच), बंगाल.

संपादकीय भूमिका

हिंदूंना अल्‍पसंख्‍यांक करून भारताच्‍या दुसर्‍या फाळणीची मागणी होण्‍याच्‍या आधी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक !