पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत !

नशेसाठी आता गांजा, एम्.डी., कोकेनच्‍या बरोबरीने ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’चा सर्रास वापर केला जात आहे. नुकतेच पुणे येथे सव्‍वा कोटी रुपये मूल्‍याचे १ सहस्र २०० पेक्षा अधिक ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ पोलिसांनी जप्‍त केले आहेत. गुन्‍हे शाखेच्‍या अमली पदार्थ विरोधीपथकाने आरोपींकडून विचारपूस करून धागेदोरे मिळवले.

निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक !

गुन्‍हे नोंद करण्‍याचे आदेश देणार्‍या न्‍यायाधिशांना धमकावल्‍याप्रकरणी येथील निलंबित पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना पोलिसांनी २ जूनच्‍या रात्री अटक केली. त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.

शिवराज्यभिषेकदिनी कोल्हापूर येथे धर्मांधांनी ठेवले टिपू सुलतान याच्या  समर्थनार्थ ‘स्टेटस’ !

हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून त्यांचे हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे !

‘७२ हुरे’ चित्रपट ७ जुलै या दिवशी प्रदर्शित होणार !

या चित्रपटात आतंकवादी कसाब, ओसामा बिन लादेन, याकूब मेनन, मसूद अझहर आणि हाफीज सईद यांना दाखवण्यात आले आहे. यासह भारतात झालेल्या आतंकवादी कारवायांच्या घटनाही दाखवण्यात आल्या आहेत.

#Exclusive – भ्रष्टाचाराचा आगडोंब : महाराष्ट्रातील ४७ पैकी ३४ प्रशासकीय विभाग भ्रष्ट !

लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन जनताभिमुख कारभार काय करणार ? सरकारने अशा लाचखोरांची हकालपट्टी केली पाहिजे !

प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, श्री तुळजाभवानीदेवीची प्राचीन ७१ नाणी गायब झालेल्या प्रकरणात १ महंत, ३ तत्कालीन अधिकारी आणि २ धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

पॉस्को अंतर्गत गुन्हा असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला !

पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो पळून गेला. पोलिसांनी संपूर्ण परिसर आणि जंगलामध्ये शोधमोहीम तीव्र केली आहे. अन्वेषण चालू असतांना कह्यात असलेल्या आरोपीने पलायन करणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

दाभोळ येथील भारती शिपयार्ड आस्थापनात स्थानिकांना प्राधान्य हवेच ! – माजी खासदार नीलेश राणे

राणे म्हणाले, ‘‘उद्योग चालले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे; मात्र आस्थापनाकडून जर स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल, ते उपाशी रहाणार असतील, तर आम्ही कामगारांच्या बाजूने उभे रहाणार.

निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाचे काम हे पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन ! – लेखक धीरज वाटेकर

पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात असलेली अनास्था न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे.

मणीपूर येथील हिंसाचारात घायाळ झालेल्या सैनिकाचे निधन

हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत.