पॉस्को अंतर्गत गुन्हा असलेला संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला !


रत्नागिरी – १७ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आलेला संदीप बापू शेळके (२८) हा संशयित आरोपी चिपळूण पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे. ५ जूनला दुपारी चिपळूण पेढांबे येथे घटनास्थळी त्याला पोलीस घेऊन गेले असता त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढलाचे वृत्त दैनिक ‘प्रहार’च्या वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

संदीप शेळके या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून अत्याचार केले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता. पॉस्को अंतर्गत अन्वेषण चालू असतांना संदीप याला पोलिसांनी त्याचे काका रामभाऊ शेळके यांच्या घरात घेऊन गेले होते. हीच संधी साधून घराच्या मागील बाजूने तो जंगलाच्या दिशेने पळत सुटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो पळून गेला. पोलिसांनी संपूर्ण परिसर आणि जंगलामध्ये शोधमोहीम तीव्र केली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अन्वेषण चालू आहे.

प्रतिकात्मक चित्र

संपादकीय भूमिका

अन्वेषण चालू असतांना कह्यात असलेल्या आरोपीने पलायन करणे, हे पोलिसांना लज्जास्पद !