‘७२ हुरे’ चित्रपट ७ जुलै या दिवशी प्रदर्शित होणार !

चित्रपट जिहादी आतंकवादावर टाकतो प्रकाश

नवी देहली –‘द केरला स्टोरी’मुळे लव्ह जिहादविषयी भारतभर चर्चा चालू असतांना आता ‘७२ हुरे’ (७२ हुरे ही इस्लामी संकल्पना असून त्यानुसार इस्लामचे काटेकोर पालन करणारे स्वर्गात गेल्यावर त्यांना ७२ सुंदर युवतींचा सहवास लाभतो.) या चित्रपटाचे विज्ञापन (टिझर) प्रसारित झाले आहे. यामध्ये ‘तू जो जिहादचा मार्ग अवलंबला आहेस, तो तुला स्वार्गात घेऊन जाईल’, असा संवाद आहे.

या चित्रपटात सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू आहे. अशोक पंडित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पवन मल्होत्रा आणि आमीर बशीर यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत.

या चित्रपटाच्या विज्ञापनात आतंकवादी कसाब, ओसामा बिन लादेन, याकूब मेनन, मसूद अझहर आणि हाफीज सईद यांना दाखवण्यात आले आहे. यासह भारतात झालेल्या आतंकवादी कारवायांच्या घटनाही दाखवण्यात आल्या आहेत. ‘७२ हुरे’ हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी अशोक पंडित यांनी ‘चित्रपटाचा ‘टिझर’ तुम्हाला आवडेल, अशी अपेक्षा करतो. आतंकवादाचे प्रशिक्षण देणार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार तुम्हाला ‘७२ हुरे’  भेटण्याऐवजी तुम्ही क्रूरपणे मृत्यूचे शिकार झालात तर ?’ असे ट्वीट केले आहे.