मणीपूर येथील हिंसाचारात घायाळ झालेल्या सैनिकाचे निधन

सीमा सुरक्षा दलाचे सैनिक

इंफाळ (मणीपूर) – येथे ५ जूनला झालेल्या हिंसाचारात गोळी लागलेल्या  सीमा सुरक्षा दलाचे सैनिक रंजीत यादव यांचे उपचाराच्या वेळी निधन झाले. शोधमोहिमेच्या वेळी स्थानिक आक्रमक आणि सैनिक यांच्यात चकमक उडाली. यात यादव घायाळ झाले होते. त्यांच्या समवेत आणखी एक सैनिक घायाळ झाला होता.

राज्यातील हिंदु मेईतेई समाज आणि ख्रिस्ती कुकी समाज यांच्यात आरक्षणावरून ३ मेपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला असून ३१० जण घायाळ झाले आहेत. त्याचबरोबर ३७ सहस्रांहून अधिक लोकांना साहाय्य छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. ११ जिल्ह्यांना हिंसाचाराचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.