लव्ह जिहादचे वाढते संकट जाणा !

उत्तराखंडमधील पछुवा डेहराडूनमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये लव्ह जिहादची ८ ते १० प्रकरणे समोर आली आहेत. ३ घटनांतील आरोपी पूर्वी केरळमध्ये जाऊन आल्याने ‘केरळमध्ये लव्ह जिहादचे प्रशिक्षण दिले जाते का ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.

पुण्यातील ‘एपीएस वेल्थ व्हेंचर्स’ या आस्थापनाकडून १२२ कोटी रुपयांची फसवणूक !

या आस्थापनामध्ये अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या आस्थापनामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी एका धर्मांधाला अटक !

पुन्हा असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

सातारा जिल्ह्यातील २०० हून अधिक शासकीय वाहने भंगारात !

शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मेपासून भंगारात काढण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील २०० हून अधिक शासकीय वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत.

उत्तराखंडच्या मंत्र्यावर ‘या खुदा’ म्हणत मुसलमान तरुणाचा आक्रमणाचा प्रयत्न !

जेव्हा धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करतो, तेव्हा तो मानसिक रुग्ण असल्याचा दावा पोलीस नेहमीच करतात. असाच दावा आता या तरुणाचे कुटुंबीय करत आहेत. हा एक धूळफेकीचाच प्रकार आहे, हे स्पष्ट होते !

छत्रपती संभाजीनगर येथे फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना अटक !

आरोपी राजपूत आणि पूजा भालेराव हे दोघे महिलेच्या घरी जाऊन पोर्टेबल यंत्राच्या साहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी करत असतांना पोलिसांनी धाड टाकून दोघांना कह्यात घेतले.

भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा इम्रान खान पाकसाठी अधिक धोकादायक ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

इम्रान खान हे सर्वांत मोठे बंडखोर आहेत. ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत आणि ९ मे हा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे.’’ इम्रान खान यांना झालेल्या अटकेनंतर पाकमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

छत्रपती संभाजीनगर येथे मुंबई पोलिसांच्या पथकावर जीवघेणे आक्रमण !

आता पोलिसांचेही संरक्षण करण्याची वेळ आली आहे ! पोलिसांवरच जमावाकडून आक्रमण होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय ? यातून पोलिसांचा धाक अल्प होत आहे, हे लक्षात येते.