भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा इम्रान खान पाकसाठी अधिक धोकादायक ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुम्ही तुमच्या विदेशी शत्रूला ओळखता. पाकिस्तानातील लोक अजूनही येथे जन्मलेल्या शत्रूला ओळखू शकलेले नाहीत. तो भारतापेक्षा मोठा धोकादायक आहे.

इम्रान खान सध्या आपल्यामध्ये आहेत आणि ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा पाकिस्तानसाठी अधिक धोकादायक आहेत; पण लोकांना हे दिसत नाही, असे विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘कोण अधिक धोकादायक आहे? जो आपल्यात आहे कि आपल्या समोर जो सीमेपलीकडे उभा आहे तो ?’, असा प्रश्‍न आसिफ यांना विचारण्यात आला होता.

आसिफ म्हणाले, ‘‘इम्रान खान हे सर्वांत मोठे बंडखोर आहेत. ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत आणि ९ मे हा त्याचा सर्वांत मोठा पुरावा आहे.’’ इम्रान खान यांना ९ मे या दिवशी झालेल्या अटकेनंतर पाकमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.