पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी एका धर्मांधाला अटक !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे – एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३ नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीने हा प्रकार समुपदेशन करणार्‍या शिक्षकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी मुन्ना नदाफ याला अटक केली आहे. इतर २ आरोपी पसार असून कोंढवा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा प्रकार वर्ष २०१८ ते २०१९ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार अल्पवयीन मुलगी तेव्हा ७ वी मध्ये होती. ती घराशेजारी खेळत असतांना एका घरातील खिडकीतून पडलेली वस्तू देण्याकरता ती त्या घरात गेली होती. तेव्हा मुन्ना आणि त्याच्या २ साथीदारांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. कुणाला सांगितल्यास कुटुंबियांना त्रास देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पिडीत मुलीने घाबरून घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नव्हता.

संपादकीय भूमिका

पुन्हा असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !