पुण्यातील ‘एपीएस वेल्थ व्हेंचर्स’ या आस्थापनाकडून १२२ कोटी रुपयांची फसवणूक !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे – ‘एपीएस वेल्थ व्हेंचर्स’ आस्थापनाने गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून गुंतवणूकदारांची १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक अन्वेषण केल्यावर हा आकडा १२२ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. या प्रकरणात आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी या आस्थापनाचे संचालक अविनाश राठोड, पत्नी विशाखा यांच्यासह अन्य संचालकांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ. जयदीप जाधव यांनी तक्रार दिली आहे.

या आस्थापनामध्ये अनेक नागरिकांनी गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या आस्थापनामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.