पृथ्वीच्या मध्यभागाचे संशोधन करण्यासाठी चीन करत आहे ३२ सहस्र ८०८ फूट खोदकाम !

४५७ दिवसांत पूर्ण करणार खोदकाम !

बीजिंग (चीन) – चीनने पृथ्वीच्या मध्यभागाचे संशोधन करण्यासाठी ३२ सहस्र ८०८ फूट खोल खोदकाम चालू केले आहे. शिनजियांग भागातील तारिम तेलक्षेत्राजवळ हे खोदकाम केले जात आहे.

चीनने याला ‘संशोधन प्रकल्प’ असे संबोधले आहे, जो ४५७ दिवसांत पूर्ण होऊ शकतो. याआधी वर्ष १९८९ मध्ये रशियाने पृथ्वीच्या मध्यभागी ४० सहस्र २३० फूट खोल खोदकाम केले होते. त्याला २० वर्षे लागली. त्याला ‘कोला सुपरडीप बोअरहोल’ असे नाव देण्यात आले.