ओडिशात भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९० हून अधिक !

भुवनेश्‍वर येथून चेन्नईला जाणार्‍या कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला रात्री मोठा अपघात झाला.

देशद्रोहाचा कायदा रहित केला जाऊ शकत नाही ! – विधी आयोग

अहवालात सांगण्यात आले आहे की, कलम ‘१२४ अ’चा दुरुपयोग होऊ नये, यासाठी त्यामध्ये सरकारने आवश्यक दिशानिर्देश द्यावेत. तथापि तो रहित केल्यास देशाची अखंडता आणि सुरक्षितता यांवर परिणाम होऊ शकतो.

बांदा (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक बलात्कार !

पीडितेने सांगितले की, धर्मांध मुसलमानाने माझे धर्मांतर केले. ‘द केरल स्टोरी’नुसार हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या षड्यंत्रामध्ये फसवण्यासाठी मुसलमान महिलाही भूमिका बजावतात. त्याचे हे आणखी एक उदाहरण !

इस्रो जुलैमध्ये ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार !

इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतोच, असे नाही; पण त्यातून शिकून पुढे जायला हवे. अपयश आले; म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये.

फिलिपाईन्समध्ये ख्रिस्त्यांकडून होत आहे घटस्फोटाचा कायदा करण्याची मागणी !

एका महिलेने सांगितले की, सध्या ख्रिस्ती असतांना घटस्फोट मिळणे कठीण आहे. इस्लाम स्वीकारल्यास घटस्फोट सहज मिळू शकतो.

(म्हणे) ‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष !’-राहुल गांधी

ज्या पक्षाने भारताची फाळणी केली, त्या पक्षाला राहुल गांधी कशाच्या आधारे धर्मनिरपेक्ष ठरवत आहेत ? जर मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल, तर धर्मांध पक्ष कोणता ? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

कुटुंबियांना फसवून अनामिका बनली ‘उजमा फातिमा’; मुसलमान युवकाशी केला विवाह !

मध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !

दहावीचा निकाल ९३.८३ टक्के !

कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल : दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १५ लाख २९ सहस्र ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १४ लाख ३४ सहस्र ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय !

श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जून या दिवशी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ आणि सीसीटीव्ही छायाचित्रकाच्या देखरेखीत ही प्रक्रिया होणार आहे.

राजौरी (काश्मीर) येथे झालेल्या चकमकीत १ आतंकवादी ठार !

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !