दहावीचा निकाल ९३.८३ टक्के !

कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल

यंदाचा दहावीचा निकाल ९३.८३ टक्के; कोकण पुन्हा प्रथम !

मुंबई – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

(सौजन्य : DD Sahyadri News)

यंदा ९५.८७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक, म्हणजे ९८.११ टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वांत न्यून निकाल लागला आहे.

दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १५ लाख २९ सहस्र ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १४ लाख ३४ सहस्र ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.