राजौरी (काश्मीर) येथे झालेल्या चकमकीत १ आतंकवादी ठार !

२-३ आतंकवादी लपल्याची माहिती, शोधमोहीम चालू !

राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राज्यातील राजौरी जिल्ह्यात २ जूनच्या सकाळी सुरक्षा दल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १ आतंकवादी ठार झाला. जिल्ह्यातील दसल भागात २-३ आतंकवादी लपल्याचा संशय असून तेथे सुरक्षा दलांनी शोधमोहीम चालू केली आहे.

१ जूनला सायंकाळी येथील सांबा सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले होते. नुकतेच राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून शस्त्रे अन् दारूगोळा जप्त केला.

संपादकीय भूमिका

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आतंकवाद्यांंच्या निर्मितीचा कारखाना असलेल्या पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !