फिलिपाईन्समध्ये ख्रिस्त्यांकडून होत आहे घटस्फोटाचा कायदा करण्याची मागणी !

व्हॅटिकन सिटीनंतर फिलिपाईन्समध्येही ख्रिस्त्यांना नाही घटस्फोटाचा अधिकार !

मनीला (फिलीपाईन्स) – येथील ख्रिस्त्यांनी घटस्फोटाचा अधिकार मिळण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. या देशामध्ये कॅथॉलिक ख्रिस्त्यांना घटस्फोटाचा अधिकार नाही. काही खासदार आता घटस्फोटासाठी खासगी विधेयक आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वी २ वेळा घटस्फोटाचा कायदा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र समर्थनाअभावी तो अपयशी ठरला.


वर्ष २०१८ मध्ये ससंदेच्या कनिष्ठ सभागृहाने घटस्फोटाच्या विधेयकाला संमती दिली होती; मात्र वरिष्ठ सभागृहाने तो फेटाळला होता. जगात व्हॅटिकन सिटीनंतर फिलिपाईन्समध्ये ख्रिस्त्यांना घटस्फोटाचा अधिकार नाही. पाद्री जेरोम सेलिनो यांनी घटस्फोटाला विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘परंपरा मोडणे चुकीचे आहे.’ फिलिपाईन्सची लोकसंख्या केवळ १ कोटी १० लाख असून त्यापैकी ७८ टक्के ख्रिस्ती आहेत.

घटस्फोटासाठी मुसलमान होण्यास महिला सिद्ध !

एका महिलेने सांगितले की, सध्या ख्रिस्ती असतांना घटस्फोट मिळणे कठीण आहे. इस्लाम स्वीकारल्यास घटस्फोट सहज मिळू शकतो. अन्य एका महिलेने सांगितले की, मी माझ्या पतीच्या घरी रहात नाही. मला एक मित्र आहे. मी दुसरा विवाह करू शकत नाही; कारण घटस्फोट झालेला नाही. जोपर्यंत देशात घटस्फोटाचा कायदा बनत नाही, तोपर्यंत मी माझ्या मुलांचा विवाह करणार नाही.