|

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले असून अनामिका नावाच्या हिंदु युवतीने आई-वडिलांना फसवून महंमद अयाझ या मुसलमान प्रेमीसह पळून जाऊन विवाह केला. दोघांनी न्यायालयात जाऊन आधीच विवाह केला असून ७ जून या दिवशी असलेल्या पारंपरिक विवाहाची निमंत्रणपत्रिका सामाजिक माध्यमांतून पसरल्यावर हा विषय समोर आला. पत्रिकेमध्ये २२ वर्षीय अनामिकाचे नाव ‘उजमा फातिमा’ असे लिहिण्यात आले आहे. तिने धर्मांतर केले असून पीडित आई-वडील आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, महंमदने स्वत:ची मुसलमान ओळख लपवून त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमीष दाखवून तिचे धर्मांतर केले. त्यांनी आरोप केला की, नियमानुसार विवाह नोंदणी अधिकार्याने नोटीस पाठवायला हवी. तशी नोटीसही त्यांनी पाठवलेली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी मुसलमान मुलासह संबंधित विवाह नोंदणी निबंधकावरही कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
(सौजन्य : Zee News)
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! |
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena