तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेले सोने आणि चांदी वितळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ जून या दिवशी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ आणि सीसीटीव्ही छायाचित्रकाच्या देखरेखीत ही प्रक्रिया होणार आहे.
यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. ओम्बासे यांनी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये नायब तहसीलदार, धर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, पुजारी मंडळाचे उपाध्ये अनंत कोंडो, महंत चिलोजीबुवा, महंत तुकोजीबुवा, ‘बँक ऑफ इंडिया’चे सोनार धनंजय वेदपाठक आणि रवी महामुनी यांचा समावेश आहे.