नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जुलै मासामध्ये ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार आहे. जर हे प्रक्षेपण यशस्वी झाले, तर भारत असे करणारा चौथा देश बनेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने त्यांचे अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे.
‘चंद्रयान-२’ २२ जुलै २०१९ या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले होते. ७ सप्टेंबर २०१९ या दिवशी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात असतांना खाली पडले होते.
At A Cost Of Rs 600 Crore, This Is Why The Chandrayaan-3 Mission Is ISRO’s Most Difficult One Yet #worth #business https://t.co/pSK9G8iDNB
— Indiatimes (@indiatimes) May 31, 2023
इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-२ मोहिमेत आम्ही अपयशी ठरलो. प्रत्येक वेळी आपण यशस्वी होतोच, असे नाही; पण त्यातून शिकून पुढे जायला हवे. अपयश आले; म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देऊ नये. चंद्रयान-३ मोहिमेतून आपल्याला पुष्कळ काही शिकायला मिळेल आणि आपण इतिहास घडवू.
Chandrayaan-3 will be launched in July this year, chief of Indian Space Research Organisation (ISRO) S Somanath confirmed
Know all the details #chandrayaan3 #chandrayaan3launch #isro #moon pic.twitter.com/poZNmMYUFQ
— News18 (@CNNnews18) May 30, 2023