(म्हणे) ‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष !’-राहुल गांधी

राहुल गांधी यांचा जागतिक विनोद !

वॉशिंग्टन (अमेरिका) – मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे पत्रकारांनी केरळमधील मुस्लिम लीगशी युती करण्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना केले. ते म्हणाले, ‘विरोधक एकत्र येत आहेत. आम्ही सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. या संदर्भात बरेच चांगले काम चालू आहे.’ राहुल गांधी सध्या ६ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर आहेत.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मला वाटते सर्व भारतियांना धार्मिक स्वातंत्र्य असले पाहिजे. सर्व भारतीय समुदायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले पाहिजे. मी लोकांमध्ये त्यांचा धर्म आणि जात यांच्या आधारावर भेद करत नाही. भारत म्हणजे काय आणि कसा असावा ? याच्या गांधीवादी विचारांनुसार मी लहानाचा मोठा झालो. मी जीवे मारण्याच्या धमक्यांना घाबरत नाही. शेवटी प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे. हे मी माझ्या आजी आणि वडील यांच्याकडून शिकलो. मी धमक्यांना घाबरून थांबत नाही.

संपादकीय भूमिका

  • जर मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष असेल, तर धर्मांध पक्ष कोणता ? याचा आता शोध घ्यावा लागेल !
  • ज्या पक्षाने भारताची फाळणी केली, त्या पक्षाला राहुल गांधी कशाच्या आधारे धर्मनिरपेक्ष ठरवत आहेत ?, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !