इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्‍यासाठी ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे आळंदीत साखळी उपोषण !

इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्‍यासाठी, तसेच ते करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्‍यासाठी येथील संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वत मार्गावर दरड कोसळून एका भाविकाचा मृत्‍यू !

ही घटना २ मे या दिवशी ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असतांना घडली. भानुदास आरडे असे त्‍या भाविकाचे नाव आहे.

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.

पुणे शहराध्‍यक्ष प्रशांत जगताप यांच्‍यासह सर्व पदाधिकार्‍यांचे त्‍यागपत्र !

शरद पवार यांनी राष्‍ट्रवादीच्‍या अध्‍यक्षपदाचे त्‍यागपत्र दिल्‍याचे प्रकरण

कोयना धरणातून सोडले कर्नाटकला पिण्‍यासाठी पाणी !

कर्नाटक राज्‍याने पिण्‍यासाठी पाणी मागितल्‍याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्‍त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्‍यात आले.

पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनचे आक्रमण ! – रशियाचा आरोप

युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्‍टकरी वर्गासाठी मोठे कार्य केले ! – बाबा भांड

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी, कष्‍टकरी, आदिवासी, दलित वर्गासाठी केलेले कार्य कालातीत आहे, असे प्रतिपादन लेखक-प्रकाशक बाबा भांड यांनी केले. ‘मिरज विद्यार्थी संघा’च्‍या वसंत व्‍याख्‍यानमालेच्‍या उद़्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश दिला.

सोलापूर विद्यापिठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची निवड !    

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदी डॉ. आर्.के. कामत यांची राज्‍यपाल रमेश बैस यांनी निवड केली आहे. याविषयीचे पत्र कुलपती कार्यालयाकडून देण्‍यात आले आहे.

अवैध वाळूउपसा केल्‍यास थेट ‘मकोका’ लागणार ! – महसूलमंत्री विखे पाटील

वाळूच्‍या अवैध वाहतुकीस आणि तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नव्‍या वाळू धोरणाची घोषणा करत थेट ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू ‘अधिकृत डेपो’वरून विकण्‍याचा निर्णय घेतला आहे.