कोयना धरण
सातारा, ३ मे (वार्ता.) – कर्नाटक राज्याने पिण्यासाठी पाणी मागितल्याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे कोयना नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यामुळे काठालगतच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. सध्या नदीपात्रात प्रतिसेकंद ४२०० क्युसेक्स एवढा विसर्ग चालू आहे. सध्या कोयना धरणात ३८.१७ टी.एम्.सी. पाणीसाठा उपलब्ध असून पाण्याची उंची २ सहस्र १९ फूट एवढी आहे. राज्यातील सिंचनासाठी २ जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २ सहस्र १०० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.