युक्रेनने दावा फेटाळला !
मॉस्को (रशिया) – युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.
Russia accused Ukraine of a failed attempt to assassinate President Vladimir Putin in a drone attack on the Kremlin citadel in Moscow and threatened to retaliate https://t.co/mdziCegayE
— Reuters (@Reuters) May 4, 2023
रशियाला सूड घेण्याचा अधिकार आहे, अशी अधिकृत भूमिका रशियाने या घटनेनंतर घेतली आहे.
Russia accused Ukraine of attacking the Kremlin with drones overnight in a failed attempt to kill President Vladimir Putin. A senior Ukrainian presidential official said Kyiv had nothing to do with the purported incident https://t.co/Nih63r20Vn pic.twitter.com/U9dsfYVxzi
— Reuters (@Reuters) May 3, 2023
उभय देशांमध्ये १४ मासांपासून चालू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंतचा रशियाचा युक्रेनच्या विरोधातील हा सर्वांत मोठा आरोप आहे.
युक्रेनने मात्र रशियाचा हा दावा फेटाळून लावला असून ‘रशिया या माध्यमातून ‘मोठा आतंकवादी सूड’ उगवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असा प्रत्यारोप केला आहे.