Bangladeshi Infiltrators Attack On HINDUS : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : महापालिकेच्या पथकावर बांगलादेशी घुसखोरांकडून आक्रमण

  • महिला कर्मचार्‍यांच्या गळ्यातील दागिन्यांची लूटमार !

  • महापालिकेने बांगलादेशी मुसलमानांच्या ५० बेकायदेशीर झोपड्या पाडल्या

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे २९ डिसेंबरला महानगरपालिकेच्या पथकावर २०० हून अधिक बांगलादेशी घुसखोर जमावाने आक्रमण केले. पथकाकडून येथील बेकायदेशीर हातगाड्या जप्त करतांना हे आक्रमण करण्यात आले. यात मुसलमान महिलांचाही समावेश होता. आक्रमणासमवेत पथकातील महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांची लूटमारही करण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली.

महिला सहकार्‍याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर कामगारांना मारहाण करून त्यांचे भ्रमणभाष हिसकावून घेण्यात आले. घटनास्थळी उपस्थित अन्न निरीक्षक विजेता द्विवेदी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या वाहनचालकाला गाडीतून बाहेर काढून ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली. हे आक्रमण बांगलादेशी मुसलमान यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. शेरू आणि नदीम यांसह अनेकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लक्ष्मणपुरीच्या महापौर सुषमा खरकवाल यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. आक्रमण करणारे बांगलादेशी असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांगलादेशींनी बेकायदेशीर वस्ती केल्याचे सांगण्यात येत आहे. या वसाहतीत पाणी आणि वीज पुरवठाही केला जात आहे. आक्रमणानंतर महापौरांनी या वस्तीची वीज जोडणी तोडली. बुलडोझर मागवून ५० झोपड्या पाडण्यात आल्या. (हे यापूर्वीच का केले नाही ? आक्रमण होण्याची वाट का पहाण्यात आली ? असे प्रश्‍न उपस्थित होतात ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदुबहुल भारतात बांगलादेशी मुसलमानांचे असे धाडस होते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !