Akhilesh Yadav On Yogi Adityanath : (म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांच्या घराखालीही शिवलिंग असून तेथेही खोदा !’

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे संतापजनक विधान

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाखालीही शिवलिंग असल्याची आमची माहिती आहे. तिथेही खोदकाम केले जावे, अशी उपरोधिक टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी केली. सध्या उत्तरप्रदेशात मंदिरे शोधण्यात येत असल्याच्या, तसेच विहिरींचे खोदकाम चालू असल्याच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘लोकांचे लक्ष वळवण्यासाठी भाजपकडून मुद्दामहून वेगवेगळे विषय पुढे केले जात असतात. भाजपच्या हातावर विकासाची नाही, तर विनाशाची रेषा आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.

अखिलेश यादव यांच्यावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी म्हटले की, संभलमध्ये खोदकाम केल्याचे अखिलेश यादव यांना वाईट वाटत आहे. वर्ष २०१३ मध्ये मुख्यमंत्री असतांना त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून १ सहस्र टन सोने काढण्यासाठी उत्खनन केले. त्यांना सोने काढण्यात रस आहे; पण उत्खनन करून शिवलिंग शोधले जात असेल, तर त्यांना अडचण वाटते.

अखिलेश यादव व योगी आदित्यनाथ

संपादकीय भूमिका

अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री असतांना अध्योध्येत कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश देऊन शेकडो कारसेवकांना ठार केले. त्यांच्या मुलाकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? हिंदूंनी त्यांना नाकारले असतांना मुसलमानांच्या मतांवर स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी वैचारिक सुंता करून घेतली आहे !