Bangladeshi Hindu Woman Gangraped : बांगलादेशात हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार, महिलेचा मृत्यू !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात अल्पसंख्य हिंदु समुदायावर हिंसाचार चालूच आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांनाच लक्ष्य केले जात नाही, तर महिलांच्या हत्या आणि बलात्कारही होत आहेत. आता एका ५२ वर्षीय हिंदु महिलेचा नरेलमध्ये गूढ मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. त्याच वेळी भारतात आलेल्या काही बांगलादेशी हिंदूंनी हिंसाचाराची वेदनादायक घटना सांगितली. पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, पीडित महिला २४ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता घरी परतली. तेव्हापासून तिला सतत उलट्या होत होत्या. त्या रात्री जेवण करून ती घरच्यांना काहीही न बोलता झोपी गेली. दुसर्‍या दिवशी २५ डिसेंबरला सकाळी महिलेची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना जेसोर जनरल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. २६ डिसेंबरच्या रात्री तिचा तेथेच मृत्यू झाला. या घटनेबाबत स्थानिक हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे.

१. एका स्थानिक तरुणाने भीतीमुळे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, संबंधित महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. यासोबतच तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात आला, त्यामुळे ती सतत तणावाखाली होती. त्यामुळेच लाजेने आणि तणावातून तिने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

२. मृत महिलेच्या मुलाने सांगितले की, त्याच्या आईला खूप घाणेरडी वागणूक दिली जात होती. यामुळे ती अस्वस्थ झाली.

हिंदु महिलेला चारित्र्यहीन ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकार महंमद साजेदुल इस्लाम यांनी सांगितले की, काही लोकांनी सांगितले की, महिलेचे त्याच गावातील एका मुलासमवेत संबंध होते. त्या रात्री स्थानिक लोकांनी त्याला रंगेहात पकडले होते. (बांगलादेशातील धर्मांध मुसलमानांप्रमाणे वागणारे धर्मांध मुसलमान पोलीस ! – संपादक)

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंना कुणीही वाली नसल्याने त्यांचा नरसंहार अटळ आहे !