महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक !

डावीकडे कोल्हापूरचे मावळते पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व उजवीकडे नवे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

कोल्हापूर – कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे पुणे येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित यांची कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. महेंद्र पंडित यांनी पूर्वी नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्या वेळी अनेक आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आले होते. कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबियांना त्यांनी जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले होते.