प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचा प्रश्न
नागपूर – राज्यघटनेची शपथ घेऊन धार्मिक द्वेष निर्माण करणारे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणारे नितेश राणे यांना मंत्रीपदावर रहाण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. केरळला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी राणे यांच्यावर टीका होत आहे.
लोंढे म्हणाले, ‘‘देशाची एकता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला ‘भारताचा पाकिस्तान’ म्हणतात आणि भाजपला मतदान न करता काँग्रेस अन् इतर विरोधी पक्षांना मतदान करणार्यांना आतंकवादी म्हणतात. अशा व्यक्तीला मंत्रीमंडळात रहाण्याचा अधिकार आहे का ?’’